गोंदिया : तडीपार आदेशात सुटका मिळवून देण्यासाठी आरोपीकडून १५ हजार रुपयांची लाच घेणार्या पोलिस हवालदाराला १७ जानेवारी रोजी गोंदिया लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. रामसिंह सुरजनाथसिंह बैस असे त्याचे नाव आहे.
तक्रारकर्त्याविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात अवैध दारुविक्री, शारीरिक गुन्हे, कौटुंबिक वाद व निवडणुकीसंदर्भात गुन्हे दाखल आहेत. याअनुषंगाने त्यांना उपविभागीय अधिकार्यांनी २0१३ मध्ये जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याविरोधात तक्रारकर्त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिक दाखल केली होती. दरम्यान न्यायालयाने तडीपारचे आदेश रद्द ठरविले आहेत. त्यानंतर ते आपल्या मूळ निवासगावी असताना गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार रामसिंह बैस यांनी तक्रारकर्त्याशी मोबाईलद्वारे संपर्क करुन, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले असून, यातून सुटका करुन घेण्यासाठी पोलिस ठाणेदारांसाठी १0 हजार व स्वत:साठी ५ हजार अशी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. याची तक्रार तक्रारकर्त्याने एसीबीकडे केली. त्याआधारे एसीबी पथकाने आज १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एका चहा टपरीवर सापळा रचून बैस यांना पंचासमक्षा १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात गोंदियाचे पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, सहायक फौजदार शिवशंकर तुंबळे, विजय खोब्रागडे, पोलिस हवालदार राजेंद्र शेंद्रे, नायक पोलिस शिपाई डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, गीता खोब्रागडे, वंदना बिसेन यांनी केली.
Related Stories
September 29, 2023
June 6, 2023