नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात सलग दुसर््या दिवशी तर आठवड्यात चार वेळा वाढ झाली. ही एकूण वाढ लक्षात घेता, या आठवड्यात पेट्रोल व डिझेलचे दर १ रुपयाने वाढले. शेतकरी, मालवाहतूकदार आणि उद्योजकांना या इंधन दरवाढीची झळ सध्या मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत आहे. इंधन दरवाढीचा भुदर्ंड येत्या काही काळात सामान्य नागरिकांना सोसावा लागण्याची चिन्हे आहेत. शनिवारी झालेली ही वाढ आठवड्यातील चौथी तर महिन्यातील विसावी दरवाढ झाल्यामुळे सध्या वाहनधारकांच्या खर्चात दररोज वाढ होत आहे. तर या इंधन दरवाढीचा परिणाम येत्या काळात वस्तू-सेवांच्या किमतीवर होणार आहे. त्यामुळे शेतमालापासून सर्वच गोष्टी महाग होण्याची भीती तज्जञांकडून व्यक्त होत आहे.
तेलाचे सर्वाधिक उत्पादन करणार्या सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्च २0२0मध्ये तेलाच्या उत्पादनात दररोज १0 लाख बॅरल्सची अतिरिक्त स्वैच्छिक कपात करण्याचे जाहीर केले. यामुळे, कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून तेलाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले. स्थानिक विक्रीकर किंवा मूल्यवर्धित कर (व्हॅट) यांच्या आधारे इंधनाचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. सध्या हे देशातील इंधनाचे विक्रमी दर आहेत. त्यामुळे ग्राहकांवरील बोजा कमी करण्यासाठी उत्पादन शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे. सौदी अरेबियाने तेलाच्या उत्पादनात घट केल्यामुळेच किमती वाढल्याचे पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते; मात्र करकपात करण्याबाबत त्यांनी कुठलेही आश्वासन दिले नव्हते.
गेल्या वर्षी तसेच २0१९ मध्ये पेट्रोल ८0 रुपये दराने मिळत होते. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले पेट्रोलचे दर पाहता लवकरच मुंबईसह इतरत्र पेट्रोलचा दर १00 रुपये होईल, असा अंदाज आहे. सुमारे महिनाभराच्या खंडानंतर, इंडियन ऑइल कॉपोर्रेशन, भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशन व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉपोर्रेशन या सरकारी तेल कंपन्यांनी ६ जानेवारीपासून दरांचे दैनंदिन पुनर्निर्धारण पुन्हा सुरू केले. तेव्हापासून पेट्रोलचे दर लिटरमागे १.९९ रुपयांनी तर डिझेलचे दर लिटरला २.0१ रुपयांनी वाढले आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरात शनिवारी लिटरमागे २५ पैशांनी वाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर लिटरला ९२.२८ रुपये, तर दिल्लीत लिटरला ८७.५0 रुपये झाले. डिझेलचे दर मुंबईत लिटरला ८२.६६ रुपये, तर दिल्लीत ७५.८८ रुपयांवर पोहोचले.
पेट्रोल-डिझेलच्या दरात आठवडाभरात चौथ्यांदा वाढ
Contents hide