नवी दिल्ली : स्नूकरपटू पंकज अडवाणी प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सानिया शददपुरीसोबत विवाह बंधनात अडकला आहे. त्याने सोशल मीडियावरून लग्नाचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.
पंकजने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या विषयी सांगताना म्हणाला की, ६ जानेवारी ही तारीख आमच्या एकत्र येण्याची तारीख असून याच दिवशी आम्ही बंधनात अडकणे भाग्याचे आहे. हा विवाह म्हणजे दोन आत्म्यांचे एकत्रित मिलन आहे. पंकज अडवाणीची जगातील सर्वोत्तम बिलिअर्डस आणि स्नूकर खेळाडूंमध्ये गणना केली जाते. आजपयर्ंत त्याने तब्बल २३ वेळा जागतिक विजेतेपद पटकावले आहे. २00६ साली राजीव गांधी खेलर% पुरस्काराने त्यास सन्मानित करण्यात आले आहे. २00९ मध्ये पद्मश्री आणि २0१८ मध्ये पद्मभूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यास सन्मानित केले आहे.
Contents hide