• Tue. Sep 26th, 2023

नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य

ByGaurav Prakashan

Jan 21, 2021

मुंबई : राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण बुधवारला झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केले. नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचे परिपत्रक काढले त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक काढावे आणि त्यानुसार नोकर भरती केली जावी, अशी विनंती केली आहे. ती विनंती मान्य झाली आहे, असे नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी नोकरभरतीचा प्रश्न उपस्थित केला, कोरोनामुळे आणि एसईबीसी आरक्षणाला स्थगिती असल्याने रखडलेली नोकरभरती पुन्हा सुरू करण्याबाबत अनेक मंत्र्यांनी केली मागणी. काही तांत्रिक बाबी दूर करून नोकरभरती सुरू करता येईल का याची चाचपणी राज्य सरकारकडून केली जाणार आहे. त्यानंतर रखडलेली नोकरभरती सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी
विद्यार्थ्यांशिवाय पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था, यांचे प्रश्न विविध स्तरावर प्रलंबित आहेत. ते तातडीने सोडवता यावे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी या अभिनव उपक्रमाची सुरुवात २५ जानेवारी २0२१ पासून कोल्हापूर येथून करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांचा दौरा केल्यानंतर लक्षात आले की,विद्यार्थी पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांच्या अडचणींसाठी सर्वांना संचालक, सहसंचालक, विद्यापीठ, मंत्रालय व इतर कार्यालयात जावे लागते. विशेषत: या प्रश्नांसंदर्भात वारंवार विविध प्रशासकीय कार्यालयात भेट देऊनही विषय प्रलंबित असतात आणि यात वेळ जातो. त्यासाठी अनेकांचा वेळ,आणि जाण्या येण्यासाठी लागणारे पैसे याची बचत व्हावी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, आपल्या दारी हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!