• Mon. Sep 25th, 2023

नुसरत जहाँ यांचे पती हिमाचलमध्ये एकटे..!

ByGaurav Prakashan

Jan 25, 2021

कोलकाता : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुसरत यांनी २0१९मध्ये उद्योजक निखिल जैनशी लग्न केले. पण आता नुसरत आणि निखिल यांच्या नात्यामध्ये दूरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इतकच नव्हे तर नुसरत या एसओएस कोलकता चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान नुसरत यांचा पती निखील जैन एकटाच हिमाचलला फिरायला गेल्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
नुकताच निखील जैनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरुन तो हिमाचलला फिरायला गेला असल्याचे दिसत आहे. सध्या त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून नुसरत कुठे आहेत असा प्रश्न अनेकजण विचारताना दिसत आहे. निखीलच्या या फोटोंवरुन निखील आणि नुसरत यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान निखीलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये वफाएं मेरी याद करोगी हे गाणे सुरु असल्याचे ऐकू येत आहे. त्याची ही स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी नुसरत या यशसोबत राजस्थानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेल्या असल्याचे म्हटले जात होते. पण यशने यावर वक्तव्य करत या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केलं. त्याने नुसरत यांच्या खासगी आयुष्याविषयी काही माहिती नसल्याचे सांगितले होते. दरम्यान यशने ते दोघे राजस्थानला गेले नसल्याचे देखील म्हटले होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!