• Mon. Sep 25th, 2023

निरोगी आरोग्याचे धडे

ByGaurav Prakashan

Jan 22, 2021

कोरोना काळ खूप शिकवणारा होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्या काळात अनेक धडे गिरवले. त्यात आरोग्यविषयक जागरुकतेचा भाग मोठा होता. कोरोना, लॉकडाउन, वर्क फ्रॉम होम, क्वारंटाइन अशा अनेक शब्दांची ओळख करून देणारे २0२0 हे वर्ष कठीण होते. हे वर्ष आपल्यासाठी अनेक कारणांनी त्रासदायक ठरले. पण, जर तुम्ही याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले तर तुम्हाला नक्कीच काही चांगल्या गोष्टी दिसतील. कठीण काळ शिकवणारा असतो, असे म्हणतात. त्याप्रमाणे या वर्षाने आपल्याला अनेक धडे दिले. आरोग्याबाबत अधिक सजग व्हायला शिकवले. मुख्य म्हणजे रोगप्रतिकार शक्ती सुधारण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. कोरोना काळात सर्वाधिक चर्चेत असलेला शब्द म्हणजे रोगप्रतिकार शक्ती. काही मंडळी किटो डाएट करत होती किंवा अगदी कमी प्रमाणात अन्न सेवन करून सेमी स्टार्व्हेशन डाएटचा अवलंब करत होती. तर काही जणांनी दिवसातून एकदाच आहार घेण्याचा पर्याय स्वीकारला. आवश्यक पोषणमूल्य पोटात गेली नाहीत तर अशक्तपणा जाणवणे साहजिक आहे. कबरेदक कमी प्रमाणात सेवन करून प्रथिनांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास आपल्या शरीरातील घातकद्रव्य वाढतात. फळे आणि धान्य या कबरेदकांच्या स्रोतांमध्ये नैसर्गिक साखर असते. ती आपल्या शरीराला ऊर्जा देते. कबरेदकांमधील काही गुणांमुळे शरीरातील पीएचचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे संतुलित आहार घेणे किती महत्त्वाचे आहे, हे कळले.
व्यायाम करण्याची का गरज असते, हे लॉकडाउनने शिकवले. त्या काळात प्रत्येकाने फिट राहण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी व्यायाम करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला. नियमित व्यायामप्रकारांसह ऐरोबिक्स, योग, ध्यानधारणा, झुम्बा डान्स हे करण्यावर भर देण्यात आला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!