मंगरुळपीर : साहेबांच्या एका सहिमुळे निराधारांचे मानधन तब्बल तिन महिन्यापासुन प्रलंबित असल्यामुळे निराधार, वृध्द,दिव्यांग,विधवा आदी योजनेमधील लार्भार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तहसीलदार यांनी याबाबत दखल घेवून मानधन खात्यात जमा करावे, अशी आर्तहाक निराधार वृध्द करीत आहेत.
महसुल विभागाच्या संजय गांधी निराधार योजना विभागाच्या अंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातुन पात्र लाभार्थ्यांना अनूदान दिले जाते. यामध्ये निराधार, दिव्यांग, विधवा परितक्ता घटस्पोटीत, वयोवृध्द, अनाथ, कुटुंब अर्थसाहाय्य योजना आदींचा समावेश आहे. याआधीचे तहसीलदार हे रजेवर गेल्यामुळे तयार असलेल्या बिलावर स्वाक्षरी न झाल्यामुळे अनुदान लाभार्थ्यांना मिळण्यास विलंब झाला. त्यानंतर आयएएस असलेले अधिकारी यांचेकडे मंगरुळनाथ तहसील कार्यालयाची धुरा आल्यामुळे सही स्कॅन होण्याची प्रकीया बाकी होती, ती प्रक्रीया झाल्यानंतर लगेच ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकल्या गेल्याने सर्व महसुल यंत्रणा त्या कामी लागली. परंतु, या कामाच्या व्यापात मात्र निराधार दिव्यांग आदींच्या अनुदानाच्या बिलावर साहेबांची सही न झाल्यामुळे अनुदान वेळेवर मिळू न शकल्याने लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
गरजु वृध्द,दिव्यांग लोक रोज तहसील कार्यालयात येऊन विचारपुस करतात. परंतु तिथे त्यांचा हिरमोड होवून नाहक मानसिक, शासिरिक आणी आर्थीक भुदर्ंडही बसत असल्याने आतातरी महसुल प्रशासनाने दखल घेवून ही निराधारांची होणारी गैरसोय थांबवावी व निराधारांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
निराधारांचे मानधन तीन महिन्यांपासून रखडले..!
Contents hide