• Wed. Jun 7th, 2023

नियंत्रण हवे खाण्या-पिण्यावर…!

ByBlog

Jan 5, 2021

आजकाल वाढत्या वजनामुळे निर्माण होणार्‍या समस्यांचं गांभीर्य लक्षात घेता वजनावर वेळीच नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु चुकीचा आहार घेतला तर वजन कमी करण्याचं उद्दिष्ट साध्य होणार नाही. खर्च होणार्‍या कॅलरींपेक्षा शरीरात जाणार्‍या कॅलरींचं प्रमाण जास्त असेल तर वजन कमी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत डाएटचाही फायदा होत नाही. मात्र, काही बाबींचा अवलंब करून करून तुम्ही खाण्यापिण्यावर नियंत्रण मिळवू शकता. खाताना छोट्या प्लेट्सचा वापर करा. प्लेट मोठी तेवढे जास्त पदार्थ तुम्ही वाढून घेता. तसंच जास्त पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळे खाताना लहान प्लेट किंवा बाउल घ्या. खाण्याचा वेग कमी ठेवा. पटापट खाल्यामुळे पोट भरल्याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि तुम्ही सतत खात राहता. हळू खाल्ल्यामुळे पचनही सुधारतं.खाताना गडद रंगाच्या प्लेट्स वापरा. पास्ता खाताना काळ्या किंवा नेव्ही ब्लू प्लेटचा वापर करा. अन्न आणि प्लेटच्या रंगसंगतीचा खाण्याच्या प्रमाणावर परिणाम होतो. तहान लागली असताना भूक लागली असं वाटून आपण जास्त खातो. त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास आधी ग्लासभर पाणी पिऊ न घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *