• Mon. Sep 18th, 2023

नामांतर लढ्याचा संघर्ष..!

ByGaurav Prakashan

Jan 14, 2021

शिक्षित व्हा चळवळी धैर्याने खेचा संघर्ष करा ..संघटित व्हा आत्मविश्वास बाळगा कधीही धीर सोडू नका ही आमच्या जीवनाची पंचसूत्री आहे…स्त्रियाच्याच प्रगतीवर समाजाची प्रगती अवलंबून आहे…आपल्या संरक्षणासाठी संरक्षण दले उभारा आपला उध्दार इतर पक्ष करणार नाहीत आपणच आता कंबर कसली पाहीजे..डाँ.बाबासाहेब आंबेडकर..संक्रातीचा जसा सुर्य मकर राशीत येतो तसाच दीर्घ कालावधीनंतर नामांतराचा आंबेडकरी जनतेला न्याय देण्या ओजस्वी सुर्या प्रमाणे तळपणारा लढा देत तेजस्वी होऊन आंबेडकरी न्यायाच्या दिशेने येतो ..तेव्हा या नामांतर दिनाची आणि शहीद झालेल्या भीम अनुयायाची आठवण येते .एका डोंळ्यात संघर्ष पेटलेला दिसतो.तर दुसर-या डोळ्यांतील आसवे बलिदान व्यर्थ न जाता त्याचे नामांतर च्या माध्यमातून फळ मिळाले असे समाधान व्यक्त होते..हा लढा
सामाजिक समता रूजविण्यासाठी होता.सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी .तळागाळातील लोकांना तसेच शेत मजूर .शेतकरी यांच्या साठी हा लढा होता .
डाँ.बाबासाहेबांनी सांस्कृतिक उत्थानाचा प्रश्न ज्या मार्गानी सोडवला तो मार्ग म्हणजे साहित्य होय .सम्यक मार्ग होय.माणसांची परस्परांसोबत सन्मान पूर्वक वागण्याची पध्दती म्हणजे संस्कृती !ज्या पध्दतीला परस्परव्देश ,विषमत्ता .वा कुठल्याही प्रकारचे शोषण मान्य नाही ती पध्दती म्हणजे संस्कृती !मानवी सौहार्दाची पूर्ण जपणूक म्हणायला हवे असा हा देशातील सर्वात मोठा ऐतिहासिक हा लढा ठरला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

१४ जानेवारी डाँ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस आहे पण या नामांतराच्या दिवसांची वाट पाहण्यासाठी आंबेडकरी जतेला तब्बल १७ वर्ष संघर्ष करावा लागला .शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभापेक्षा सर्वाधिक महत्वाचा लाभ आहे दबलेल्या नि पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण उच्च शिक्षण घेतले तरच त्यांना उत्कर्ष आहे व ते सर्वच्च शिक्षण होय.उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगती पथावर जाऊ शकतात अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षित नि कष्टपदच राहील शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे जो पाशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.आणि शिक्षणासोबतच स्वंयपुर्ण व्हा.. शिका.संघटीत व्हा आणि संघर्ष करा स्वंःताच्या सोबत समाजाचाही उध्दार करा असे डाँ बाबासाहेब यांचे ब्रिदवाक्य होतेहजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत पासुन तर आज पर्यंत जे मागासलेपणाच्या यातना भोगत असलेला समाज दुःख यातना भोगत.होता शिक्षणांची संधी मिळवून देण्यासाठी १९५० ला औरंगाबाद येथे डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी मिंलीद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रंसगी श्री गोविंद भाई श्राप आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेब यांच्या भेटीला आले होते बाबासाहेबाशी बोलताना त्या शिष्टमंडळाने प्रश्न केला आपण जे महाविद्यालय सुरू करीत आहात ते या ठिकाणी चालेल का? तेव्हा डाँ बाबासाहेब यांनी उत्तर दिले की फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापिठ उभारल्या जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि डाँ बाबासाहेब आंबेडकर याच्या विचाराचे व कष्टाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापिठाला काय नाव द्यावे हा प्रश्न समोर आला ,तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली शासन नियुक्त समितीने विचारार्ध घेतलेल्या गार्भियाने चर्चा केलेल्या नावामध्ये मराठवाडा औरंगाबाद,पैठण प्रतिष्ठान ,दौलताबाद .देवगीरी ,अंजिठा शालीवाहन सातवाहन अश्या अनेक महाराष्ट्रातील भुमीचा या समितीने विचार केला अशी ही स्थळे व भुमी राज्यवाचक होती ,फक्त दोनच नावे व्यक्तीची समितीने सुचवली ती नावे म्हणजे डाँ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज होती पण शिवाजी महाराज यांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ला होते पूढे ते 1१९६० साली स्थापन झाले पण डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्मारक झाले नाही म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डाँ.बाबासाहेब आंबेडकराचे नाव देण्याचे राज्यविधिमंडळांच्या दोन्ही सभागृहाने एकमताने २७ जुलै १९७८ ला संमत करण्यात आले .तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला फार आनंद झाला पण मनुवादी लोकांचे पित खवळले त्यांनी विद्यापीठाच्या नामातंराला कळाडून विरोध केला ..तेव्हा त्यांनी नारा काढला घरात नाही पीठ चालले मागायला विद्यापीठ..
तरी आंबेडकरी जनतेने हा विरोध बाजूला सारून नामातंर झाले पाहीजे असा लढा दिला.

नामातंर झालेच पाहिजे असा आग्रह धरून दलित जनता रस्तावर आली.नांदेड मध्ये दलित पँथरचे अनेक कार्यकर्त्यांनी लढा दिला त्यामध्ये गौतम वाघमारे या तरूणांन भर चौकात स्वंःताला जाळून घेतले तरी सरकारला न्याय करता आला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत एकच नारा होता.विद्यापीठाच नामातंर झालेच पाहीजे. पोचिराम कांबळे यांचे हात पाय समाज कंटकांनी तोडले तरी सरकार चूपच होते. त्यामध्ये जनार्दन मवाडे ,संगीता बनसोडे,प्रतिभा तायडे ,अविनाश डोंगरे ,चंदन कांबळे दिलीप रामटेके ,रोशन बोरकर अश्या कितीतरी अनेक कर्याकर्यीनी जीवनाचे बलीदान दिले .तरी सरकार चुपच होते.असा लढा भारतातील सर्वात मोठा झाला लगातार १७वर्ष चाललेला होता. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षा नंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली आणि १४ जानेवारी १९९४ रोजी नामातंर झाले..
नामातंराचा लढा केवळ विद्यापीठीची पाटी बदलणारा नव्हता तर तो समता स्वतंत्र बंधूभाव सामाजिक समता पुढे नेणारा हा लढा होता .नामातंर झाले मात्र बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सामाजिक मुल्ये रूजली नाहीत हे आजचे समाज वास्तव आहे..
सामाजिक लढा देण्यासाठी आपसातील हेवेदावे सोडून द्यावे.कारण नामातंर हि लढाई होती.या साठी कित्येकांनी आपले प्राणाचे बलिदान दिले.इंग्रजांना ही लाजवेल एवढे अत्याच्यार झाले तरी आंबेडकरी जनता मागे हटली नाही.
आज मात्र आपण पाहतो संघटन कुठेच दिसत नाही..कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही..नामातंर झाले पुढे काय ? हा प्रश्न नेहमीच असतो कारण नामांतर सारखे आज समाज जागी झाला असता तर नामांतर हे पाटीवर नाव बदलून न दिसता संघटीत क्रांती दिसायला पाहीजे होती.
भीमाचा जथा कुठे आहे..म्हणून..डाँ..बाबासाहेब आंबेडकर.म्हणतात .जर आंबेडकरी जनतेन ठरविले तर ते क्रांती करू शकतात .ते कोणत्याही परिस्थितीत लढू शकतात .ज्या प्रणाणे .दीपमालेततील न विझणार-या दिव्याप्रमाणे पक्ष लहान असुनही इतर पक्षाना मार्गदर्शन करील..
खरच हा लढा अगदी तसाच होता…आंबेडकरी जनतेन झंझावात वादळासारखा इतिहास कोरला..नामांतर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..!

    शिक्षणाची धरोहर भीमाने दिली
    क्रांतीकारी हाक ती नावाने दिली
    समाजाला जगण्याचे हक्क देण्या
    ही शक्ती आम्हा भीमयोध्दाने दिली
    सुनीता इंगळे
    मुर्तीजापूर नालंदा नगर (सिरसो)
    जेष्ठ ,,साहित्यिक तथा कवयित्री
    72 18 69 43 05