अनेकांना घरी बसल्या बसल्या नाकातील केस तोडण्याची सवय असते. तोंडाचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक पुरूष दाढी केल्यानंतर हातात कैची घेऊन नाकातील केस कापायला सुरूवात करतात. तुम्हाला माहीत आहे का? केस तोडण्याची हीच सवय तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. नकळतपणे याच सवयीमुळे तुमचा जीवसुद्धा जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला नाकातील केसांच्या महत्वाच्या गोष्टींबाबत माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. नाकात केस दोन प्रकारचे असतात. यापैकी काही केस लहान आणि काही जाड असतात. लांब नाकाच्या केसांना व्हिब्रिस म्हणतात. नाकाचे केस हे शरीराच्या संरक्षण प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण जेव्हा श्वास घेतला जातो तेव्हा ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईड तसेच बॅक्टेरिया, धूळ आणि घाण देखील शरीरात प्रवेश करते. त्यावेळी नाकातील केस धूळ, घाणीला नाकात जाण्यापासून रोखतात
नाकातील केस बॅक्टेरिया, धुळ आणि घाणीला शरीरात जाण्यापासून रोखतात. नाकात जर केस नसतील तर श्वास घेताना धूळ, माती, बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात. यामुळे मोठ्या आजारांशी सामना करावा लागू शकतो. नाकात केस असतील तर घाण, धूळ शरीरात प्रवेश करू शकत नाही. म्हणून नाकातील केस कापणं टाळायला हवं. आपले नाक स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी नाकातील केस महत्वाची भूमिका बजावतात. नाकाचे केस कापताना बॅक्टेरिया नाकात शिरतात आणि संसर्ग होऊ शकतो. याव्यतिरिक्त, नाकातील केस फुफ्फुसांच्या फिल्टरसाठी कार्य करत असतात.
नाकात रक्तवाहिन्या असतात. त्या थेट मेंदूजवळ असलेल्या रक्तवाहिन्यांशी जोडलेल्या असतात. म्हणून, धक्क्याने नाकाचे केस तोडल्यामुळे रक्तवाहिन्यांत छिद्र होते आणि रक्त बाहेर येऊ लागते. यामुळे गंभीर संसर्ग होतो, जो मेंदूच्या मज्जातंतूपयर्ंत पोहोचतो आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. नाकाचे केस न कापण्याचा प्रयत्न करा कारण नाकातील केसांमुळे धूळ, घाण आणि बॅक्टेरिया तुमच्या नाकात शिरणार नाहीत. नाकाचे केस कापायचे असल्यास लहान कात्रीने कापून घ्या किंवा आपण नाक हेअर ट्रिमर वापरू शकता.
नाकातील केस कापणे ठरू शकते हानीकारक
Contents hide