• Tue. Sep 19th, 2023

नव्या वर्षात बॉलिवूडपटांमध्ये दिसणार नव्या जोड्या

ByGaurav Prakashan

Jan 25, 2021

मुंबई : कोरोनामुळे मागचं वर्ष सिनेसृष्टीसाठी आव्हानात्मक ठरलं. गेल्या वर्षातले सुरुवातीचे दोन महिने सोडले तर त्यानंतर एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. म्हणूनच बॉलिवूड इंडस्ट्री यंदाचं वषर्ं गाजवायला आता सज्ज झाली आहे. त्यामुळे नवनवीन शक्कल लढवून प्रेक्षकांना खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यापैकीच एक म्हणजे आगामी अनेक सिनेमांतील नव्या जोड्या. आता या जोड्या हिट ठरणार की नाही हे मात्र प्रेक्षकच ठरवतील. रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या अफेअरबद्दल अनेकदा बोललं जातं. या दोघांनी एका सिनेमात काम करावं अशी अनेकांची इच्छा होती. त्यांची इच्छा ‘ब्रह्मस्त्र’ या सिनेमातून पूर्ण होते?. या चित्रपटामध्ये ते एकत्र झळकणार आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन लवकरच फायटर या चित्रपटात रोमॅन्स करताना दिसतील. या दोघांनी यापूर्वी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांना तशी संधी मिळाली नव्हती. पण फायटरच्या निमित्तानं ते एकत्र काम करणार आहेत. हृतिकनंतर दीपिका दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासबरोबर मोठ्या पडद्यावर दिसेल. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे पॅन-इंडिया चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत. ‘लीगर’ असं या सिनेमाचं नाव असून करण जोहर याची निर्मिती करतोय.
अभिनेता अक्षयकुमार अनेकदा नवोदित अभिनेत्रींसोबत काम करताना दिसला आहे. लॉकडाउननंतर एका शेड्युलमध्ये पूर्ण झालेल्या बेलबॉटम या त्याच्या सिनेमात तो वाणी कपूरबरोबर दिसणार आहे. तर मृणाल ठाकूरही शाहिद कपूर आणि फरहान अख्तर यांच्याबरोबर अनुक्रमे जर्सी आणि तुफान या चित्रपटांतून पहिल्यांदाच काम करणार आहे. या नव्या जोड्या प्रेक्षकांना किती भावतात हे आगामी काळच ठरवेल. आगामी महिन्यांमध्ये अभिनेता राजकुमार राव तीन वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. विशेष म्हणजे या तिन्ही अभिनेत्रींसोबत तो पहिल्यांदाच काम करतोय. सध्या तो अभिनेत्री भूमी पेडणेकर सोबत बधाई दो या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. तसंच नंतर तो ह्यरुही अफजा या सिनेमात जान्हवी कपूरबरोबर दिसणार आहे. सोबतच वेबवर प्रदर्शित होणार्‍या द वाईट टायगर या थरारक सिनेमात तो प्रियांका चोप्रा सोबत स्क्रीन शेअर करतोय. त्याचप्रमाणे दुसरीकडे अभिनेत्री कियारा आडवाणी देखील तीन वेगवगेळ्या अभिनेत्यांसोबत दिसणार आहे.
सध्या वरूण आणि कियारा जुग जुग जीओ या चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. तसंच ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत शेरशाहमध्ये आणि कार्तिक आर्यन सोबत भुलभुलैय्या २ मध्ये दिसणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!