• Mon. Sep 25th, 2023

नंबर मायना राखता है..!

ByGaurav Prakashan

Jan 14, 2021

सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञाचे आहे. सध्याचे युग हे अंकाचं किंवा आकड्यांचं आहे असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जेव्हा आपण टेलिफोनच्या युगात वावरत होतो तेव्हा पासून आपण नंबर फिरवायला लागलो होतो.
जन्मल्या नंतर काही वर्ष आपले बालपणाचे चांगले जातात. कळत न कळत आपल्यावर संस्कार होत असतात. अस म्हणतात की, आपण अनुभवातून व अनुकरणातून शिकत असतो. ही बालपणाची काही वर्ष मजेत गेली की, आपल्या मागे शाळा लागते. इथूनच आपल्या मागे नंबर लागतो. घरातील अर्थात कुटुंबातील थोरल्या पासून तर लहानां पर्यंत सर्वांच्या नजरा व अपेक्षा आपल्यावर असतात. त्या म्हणजे आपला पहिला नंबर आला पाहिजे. ह्या आपल्या अपेक्षांचं ओझ घेऊन आपलं शाळे पासून तर महाविद्यालयीन शिक्षण घेई पर्यंत सतत बाळगत असतो. परंतु ह्या नंबरचा पिच्छा काही सुटत नाही.
काही काळा नंतर मोबाइलचे युग आले. हे पण आकड्यांचेच. बँक खात्यांचा नंबर आकड्यांचाच तर आपल्या वाहनांचा नंबर सुद्धा आकड्यांचाच. माणसाला ही कधी आकड्यांची ओळख झाली हे सुद्धा कळलेच नाही आणि माणूस हा एक आकड्याने ओळखल्या जाऊ लागला. माझा अरविंद मोरेचा मोबाइल नंबर ९४२३१२५२५१ असा आहे तर मोबाइल कंपनी साठी हा माझा मोबाइल नंबर किंवा ग्राहक क्रमांक ही माझी ओळख आहे नाही की नाव अरविंद मोरे. तसेच वीज बिलाचे व पाणी बिलाचे सुद्धा आहे. माणसाची ओळख अंकाने होऊ लागली. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो नौकरी व्यवसायाला लागतो. इथे पण त्याचा पाठलाग नंबर सोडत नाही. व्यवसायात व नौकरीत सुद्धा सुरु होते लक्ष्य (टार्गेट). हे लक्ष्य (टार्गेट) दुसरे तिसरे काही नसून नंबरच असतो. सगळी हयात त्याची हे टार्गेटच पाठलाग करण्यातच जातो पण हे टार्गेट काही करून पूर्ण होत नाही.
शाळेत त्याला म्हटले जाते अच्छे नंबर लाओ, चांगले गुण (अंक) मिळव. धंदा (व्यवसाय) व नौकरीत म्हटले जाते लक्ष्य प्राप्त करो. नौकरी करीत असतानी बॉस म्हणतो कुछ भी करो लक्ष्य प्राप्त करो. आखरी नंबर मायने राखता है. यदी हमने लक्ष्य (टार्गेट) प्राप्त किया तो हमारी प्रशंसा की जाती है. यदी बॉस को संख्या का लक्ष्य प्राप्त नही होता हुआ दिखाई देता है तो वह बडा नाखूष हो जाता है. वह लक्ष्य प्राप्त करणे की जिद करता है और सभी को लक्ष्य अर्थात टार्गेट को लक्ष्य केंद्रित करता है. सध्या आपली ओळख ही आधार कार्डाने होते आहे. शेवटी नंबर हा आलाच. आधार कार्डाच्या ह्या आकड्या मध्ये आपली ओळख दडलेली आहे.
अंक, गुण व नंबर हे आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग झालेले आहेत. अगोदरच्या काळी आपण जेव्हा सिनेमा बघायचो तेव्हा पोलीस किंवा जेलरचा सिन आला की कैदी नंबर आपल्याला दिसायचा. त्या कैद्याची सुद्धा ओळख ही आकड्याची असायची. प्रवासात सुद्धा सीट नंबर, बर्थ नंबर ही ओळख आहेच. म्हणजे परत एकदा आकडा / नंबर आलाच. कुठेही जा आपल्याला रांगे मध्ये राहूनच काम करावं लागत ह्यात सुद्धा आपला नंबर आलाच. खेळात सुद्धा तेच आहे. जास्त धावा, जास्त विकेट्स घेतल्या, किती खेळाडूंना बाद केले, किती गोल केले आदी.अगदी लहानपणा पासून आपल्या वर संस्कार होतात की आपण जास्त गुण मिळविले तर आपण डॉक्टर, इंजिनियर होणार. ज्याने कमी गुण मिळविले तो मागे राहणार. तेच पदोन्नतीचे आहे. त्याने जास्त परीक्षेत मार्क मिळविले तो पदोन्नत झाला, त्याला प्रमोशन मिळाले. एकंदरीत काय तर ज्याने ज्याने नंबर चांगले मिळविले तो यशश्वी झाला असे म्हटले जाते. शेती उत्पादनात सुद्धा तेच आहे किती उत्पादन काढले. आपल्या जीवनाचे शेवटी सार हेच आहे की, शेवटी नंबर मायना राखता है.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    अरविंद सं मोरे,
    अतिथी संपादक
    गौरव प्रकाशन
    नवीन पनवेल पूर्व
    मोबाइल ९४२३१२५२५१