अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात दोन दिवसात १४९ नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपयर्ंत एकूण रूग्णांची संख्या २१ हजार ४३९ झाली आहे. तर जिल्हयात आतापर्यत ४१३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून २१ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ४00 च्या जवळपास रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
देशासह राज्यात नविन पॉझिटिव्ह रूग्णांची कमी झाली असली तरी अमरावती जिल्हयात मात्र कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या मात्र सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने वाढत असलेल्या या रूग्णसंख्येमुळे प्रशासनासह नागरिकांच्या कपाळावर देखिल आळया पडू लागल्या आहे.विशेष म्हणजे कोरोना लसिकरणाची मोहिम जोरात सुरू आहे. प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे सर्रास होत असलेले उल्लंधन वाढत्या रूग्णसंख्येचे मुळ कारण असुन या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती असतांना देखिल प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमाचे अनेकांकडून उल्लंधन केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे २६ व २७ जानेवारी या दोन दिवसामध्ये जिल्हयात १४९ नविन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली असून २१ हजार ४३९ कोरोनाग्रस्त आतापर्यत आढळून आले आहेत. ४१३ रूग्णांचा आतापर्यत मृत्यू झाल असुन २१ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दोन दिवसात १४९ पॉझिटिव्ह
Contents hide