वाशिम : श्री अंतरीक्ष पार्श्वनाथ संस्थान शिरपुरच्या वतीने पंन्यासप्रवर विमलहंस विजय मुनीजी महाराज व पंन्यासप्रवर परमहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनात स्थानिक जिल्हा कारागृह येथील दोनशे कैद्यांना मायेची उब देत बँकेटचे वितरण सोमवार, ४ जानेवारी रोजी जिल्हा कारागृह अधिक्षक सोमनाथ पाडुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, वरीष्ठ तुरूंग अधिकारी बी.एन. राऊत, जैलर भापकर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक रामदास चांदवाणी, दिपक कदम, शांतिलाल मालिया, राजेश मालिया, आनंद सुराना, रमन मालिया, सुनिल उल्हामाले, सर्वाय मालिया, डॉ. हनुमान नानोटे, डॉ. सरनाईक आदींची उपस्थिती होती. शिरपुर अंतरीक्ष पार्श्वनाथच्या वतिने मागील वषर्ाीही कैद्यांना ब्लँकेट देण्यात आले होते. मानवतेच्या दुष्टीकोनातून संस्थानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
दोनशे कैदी बांधवांना मिळाली मायेची उब
Contents hide