• Tue. Jun 6th, 2023

देशाच्या पायाभूत सुविधांना गती

ByBlog

Jan 8, 2021

नवी दिल्ली : देशाच्या पायाभूत सुविधांना आधुनिक बनवण्यासाठी सुरु असलेल्या महायज्ञाला आज गती मिळाली आहे. गेल्या दिवसांत आधुनिक डिजीटल इन्फ्रास्ट्ररच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या खात्यात थेट १८,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. न्यू अटेली ते न्यू किशनगड पयर्ंत १.५ किमी लांबीच्या मालगाडीची सुरुवात करण्यासह आज भारताने जगातील काही निवडक देशांमध्ये आपले स्थान निश्‍चित केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशात आज पहिल्यांदाच इलेक्ट्रिक ट्रॅकवरुन १.५ किमी लांबीची डबल डेकर मालगाडी धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मालगाडीला हिरवी झेंडा दाखवली. देशात आज पहिल्यांदाच इलेक्ट्रिक ट्रॅकवरुन १.५ किमी लांबीची डबल स्टॅक मालगाडी धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि ती राष्ट्राला अर्पण केली. गुरुवारी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते याचे उद््घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह राजस्थान आणि हरयाणाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित होते.
आजचा दिवस एनसीआर, हरयाणा आणि राजस्थानचे शेतकरी, उद्योगपती, व्यापारी यांच्यासाठी नव्या संधी घेऊन आला आहे. डेडिकेटेड फ्रन्ट कॉरिडॉर हा ईस्टर्न किंवा वेस्टर्न असेल तो केवळ मालगाड्यांसाठी आधुनिक मार्ग नाही तर हा देशाच्या विकासाचा कॉरिडॉर आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *