धामणगाव रेल्वे : धामणगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारीला होणार आहेत या निवडणुकीकरिता अर्जाची मुदत संपली असून तालुक्यातील निंभोरा बोडखा ही ग्रामपंचायत अविरोध झाली आहे. ही ग्रामपंचायत एकूण ९ सदस्यांची असून सोमवारी शेवटच्या दिवशी नऊच लोकांनी अर्ज भरल्यामुळे सदर ग्रामपंचायत अविरोध झाली आहे या ग्रामपंचायतीचा कार्यभार आगामी पाच वर्षात गावकर्यांच्या समन्वयाने होणार असून सर्वसंमतीने अविरोध झाल्याबद्दल गावामध्ये सर्वत्र उत्साह आणि आनंदी व एकोप्याचे वातावरण आहे .नवनिर्वाचित अविरोध सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Contents hide