राळेगाव : तालुक्यात गत आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.
खरीप हंगामात अतवृष्टीमुळे संकटाचा सामना करावा लागला होता यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु जमिनीत ओलावा असल्याने रब्बी हंगामात पेरणी वाढली सध्या हरभर्याचे पीक भरले असून गत आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे तसेच गहू पिकावरील तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी आणखीच अडचणीत सापडले आहे.हरबरा पिकावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकाची फवारणी करत असल्याचे चित्र आहे यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जमिनीत भरपूर ओलावा असल्याने शेतकर्यांच्या रब्बी हंगामा कडून आशा वाढल्या आहेत शेतकर्याने गहू हरभरा पिकांना अधिक पसंती दिल्याने रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढले आहे सध्या ग्रामीण भागात हरभरा पीक बहरले असून फुलधारणा अवस्थेत आहे गत आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे हरभर्यावर अळीचा प्रादुर्भाव मात्र वाढला आहे या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी महागड्या औषधाची फवारणी करत असल्याने त्यांना आर्थिक भुदर्ंड सहन करावा लागत आहे.
मात्र या नंतरही अळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकर्यांचे चिंतेत वाढ झाली आहे सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तालुक्यात हरभरा पिकावर फवारणीला वेग आला असून कृषी विभागाने शेतीच्या बांधावर जाऊन शेतकर्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे ढग
Contents hide