• Tue. Sep 26th, 2023

डॉ. यशवंत मनोहर कोण?

ByGaurav Prakashan

Jan 19, 2021
  लेखणी माझी क्रांतिकारी
  मग ती पाळेल कसे मौन
  कवितेतूनच जाणून घ्या
  डॉ. मनोहर यशवंत कोण?
  बाबासाहेबांच्या विचारांनी
  भारावलेले चिंतनशील व्यक्ती
  मान्य कशी करतील मग
  काल्पनिक देवतेची भक्ती.
  व्रत घेतले जीवनभर पेरण्यास
  विचार महामानवाचे अती
  मग पटेल कशी त्यांना हो
  तुमची काल्पनिक देवी सरस्वती
  समाज परिवर्तनाची धमक
  सदाही त्यांच्या अंगी
  खंबीर नेतृत्व समाजाचे तत्पर
  लढण्यास लढाई विचारांची जंगी
  व्यवस्थेला उत्तर देणारा
  एक हजरजबाबी चेहरा
  आईच्या पोटी निपजतो
  असा एखादा मोहरा.
  सावित्री फातिमा शेख
  हीच खरी विद्येची देवी
  नकार देऊन पुरस्कारास
  क्रांती केली तुम्ही नवी
  बोले तैसा चाले खरोखरच
  अशी वंदनीय तुमची कृती
  पुरस्कार नाकारणारे एकमेव
  डॉ. यशवंत मनोहर जीवनव्रती
  -गणेश रामदास निकम
  चाळीसगाव गणेशपूर
  मो.न.७०५७९०४६७७, ९८३४३६१३६४
  *सदर कविता महान विचारवंत डॉ.यशवंत मनोहर जीवनव्रती पुरस्कार नाकारणारे यांच्या चरणी अर्पण*