• Tue. Sep 19th, 2023

‘डीएलएड’च्या रिक्त जागांसाठी ऑनलाईन फेरी

ByBlog

Jan 8, 2021

अमरावती : तीन फे-यानंतरही प्राथमिक शिक्षण पदविकेच्या (डी. एल. एड) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील जागा रिक्त राहिल्याने पुन्हा ऑनलाईन फेरी घेण्यात येत आहे.
वेळापत्रकानुसार, 11 ते 14 जानेवारीदरम्यान ऑनलाईन अर्ज भरणे, 15 जानेवारीपर्यंत पडताळणी अधिका-यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे, 16 जानेवारीपूर्वी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या लॉगीनमधून अध्यापक विद्यालय निश्चित करून प्रवेशपत्र काढून घेणे व 20 जानेवारीपूर्वी संबंधित अध्यापक विद्यालयाने पडताळणी करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश देणे असा कार्यक्रम आहे.
इच्छूक विद्यार्थ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांनी केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!