• Tue. Sep 19th, 2023

झोपू नकोस बहुजना

ByGaurav Prakashan

Jan 21, 2021
    रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा
    सांगू मी हे आता कुणा कुणा
    गाफील राहू नकोस तू सुखात
    उठा जागे व्हा तुम्ही बहुजना.
    अन्यायकारक कायद्यांविरुद्ध
    तू लढत जा आता नवलढाई
    मारू नकोस केवळ तुझ्या
    बंगल्या गाड्याची बढाई.
    हळूहळू तुझे संविधान भारताचे
    करू पाहत आहे पुरेपूर नष्ट
    खाजगीकरणाचा बाजार मांडून
    व्यर्थ होईल तुझे सारे कष्ट.
    गटातटात तुला विभागून असे
    तुझी हक्काची जागा होईल खाली
    तुला वाचवण्यासाठी येणार का
    तो घटनेचा पहिलवान शक्तिशाली.
    एक एक तुझ्या कायद्यावर
    ते घालतात बरोबर घाला
    सोडून द्या ही बेकी तुम्ही
    आतातरी गुमान एकीने चाला.
    संघर्ष मोठा आहे आजचा
    तू झोपेत काढू नकोस रात्र
    सुरूच ठेव गाव शहरात
    महापुरुषांचे हे विचारसत्र.
    गणेश रामदास निकम
    चाळीसगाव गणेशपूर
    मो.न.७०५७९०४६७७, ९८३४३६१३६४