• Tue. Sep 26th, 2023

जिल्ह्यातील 8 रेती स्थळांचे लिलावाच्या ई-निविदा आज प्रसिद्ध होणार

ByGaurav Prakashan

Jan 20, 2021

अमरावती : सन 2020-21 ( 9 जुलै 2019 अखेरपर्यंत) वर्षासाठी अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 8 रेती स्थळांच्या लिलावाची ई-निविदा -ई लिलाव ऑनलाईन प्रक्रियेबाबतचा संपूर्ण तपशील उद्या दि. 20 जानेवारी रोजी https://amravatico.abcrocure.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.रेती घाटासंबंधीची विस्तृत माहिती उपरोक्त संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात व amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
ई-निविदा -ई लिलावामध्ये भाग घेण्यापूर्वी सदर प्रक्रियेत भाग घेणा-यांना नव्याने नोंदणी करणे तसेच डिजीटल सर्टिफिकेट काढणे आवश्यक आहे. ई-निविदाधारक तसेच लिलावधारकाकडे पॅन कार्ड, जीएसटी रजिस्ट्रेशन (जीएसटीएन कार्ड) असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना रेती ई- निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. रेती लिलावाच्या ई- निविदा ई लिलाव प्रक्रियेत सर्व संबंधितानी भाग घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांनी केलेआहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!