अमरावती, दि. 31 : जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक सुरेश राणे हे नियत वयोमानानुसार आज शासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तनिमित्त कार्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांना भेटवस्तू, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
श्री. राणे यांनी सन 1994 मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुंबई मुख्यालयातून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर अमरावती विभागात त्यांनी दीर्घकाळ वाहनचालक म्हणून विनाअपघात उत्कृष्टपणे सेवा बजावली. या सेवाकाळात त्यांनी विभागाच्या सचिव, महासंचालक, संचालक यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सेवा बजावली. श्री. राणे हे कार्यतत्पर, प्रेमळ व प्रामाणिक सहकारी असून, दुर्गम भागातील दौ-यांसह इतरही अनेक महत्वाच्या व तातडीच्या कामांसाठी त्यांनी मोलाची सेवा दिली, अशी भावना यावेळी विविध सहका-यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सहायक संचालक गजानन कोटुरवार, सहायक माहिती अधिकारी विजय राऊत, सामान्य सहायक योगेश गावंडे, दुरमुद्रणचालक मनोज थोरात, कॅमेरामन नितीन खंडारकर, मनीष झिमटे, सागर राणे, कुमार हरदुले, सुधीर पुनसे, हर्षराज हाडे, रविंद्र तिडके, गणेश वानखडे, विजय आठवले, गजानन परटके, राजश्री चोरपगार, दिपाली ढोमणे, अनिल महल्ले, रमेश बारस्कर आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी सुरेश राणे यांना भावपूर्ण निरोप
Contents hide