• Fri. Jun 9th, 2023

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला स्वच्छतेचा संदेश

ByBlog

Jan 13, 2021

अमरावती : ग्रामीण तसेच आदिवासी भागातील जनतेची संपूर्ण आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेव्दारे 28 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत स्वच्छ प्रशासन अभियान जिल्ह्यात सर्वदूर राबविण्यात आले.
या स्वच्छ प्रशासन अभियानांतर्गत 28 डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी स्वत:च्या सहभाग नोंदवून जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून जिल्हा परिषद इमारत व परिसर स्वच्छ करण्याची सुरुवात केली.
कार्यालय हे आपल्या सर्वांकरिता पुजनिय स्थान असल्याचा संदेश देत श्री येडगे म्हणाले की, स्वच्छ प्रशासन अभियानाच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेतील तसेच इतर विभागाच्या सर्व कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना मानवी जीवनात स्वच्छता महत्व पटवून दिले.
कोरोना महामारीच्या कालावधीत आपल्या सर्वांसह संबंध मानव जातीला स्वच्छतेचे महत्व लक्षात आले आहेत. कार्यालय हे आपलेकरिता एक घर असुन आपन आपल्या दैनंदिन जीवनातील बहुतेकवेळ कार्यालयाच्या वास्तुमध्ये घालवत असतो, त्यामुळे आपली वास्तु स्वच्छ, निर्मळ आनंददायी आणि निरोगी असने फार महत्वाचे आहे. तसेच हा स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जनमानसात रुजविने व त्यांच्यात उत्साह निर्माण करणे ही आज काळाची गरज झाली आहे. अशा अभियानातून कर्मचारी व अधिकारी यांच्यात कार्यालयीन काम करण्यासाठी सकारात्मक उर्जा निर्माण होण्यासोबतच समाजहिताचे विधायक काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असते, असेही श्री. येडगे यांनी स्वत: जि.प. कार्यालय व परिसराची स्वच्छता करुन पटवून दिले. सांगितले.
या अभियानाअंतर्गत एकुण 17 बाबीवर कार्य करण्याचे दृष्टीने लक्ष केंद्रित करण्यात आले असून अभिलेख वर्गिकरण, निर्लेखन, कार्यालयीन स्वच्छता व सुव्यवस्था, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे तसेच पदोन्नती प्रकरणे आदी कर्मचारी हिताच्या विषयावर भर देण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या हितासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाला असल्याची जाणिव या माध्यमातुन जोपासली जात आहे. या अभियानाला जिल्हा परिषद, आरोग्य विभागातील संपुर्ण अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिसाद दिला असुन अभियान 100 टक्के यशस्वी करण्याचे दृष्टीने कर्मचारी सज्ज झालेले आहेत.
या स्वच्छता अभियान मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रनमले यांच्या मार्गदर्शाखाली संपूर्ण विभागाचे कार्यालय, इमारत व परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती साबळे, डॉ. विनोद करंजेकर, श्री सुभाष सिडाम,श्री गजानन कोरडे, श्रीसातपुते, श्री लव्हाळे,श्रीमती वानखडे ,श्री.शिरसाठ, श्री गजाननसुने, श्री पाटील, श्री मुंडे, श्री वारकरी यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *