चांदूर रेल्व : चांदूर रेल्वे तालुक्यात २९ ग्रामपंचायतमधील निवडणूक लढविणार्या अंतिम उमेदवारांची यादी असलेल्या ईव्हीएम मशीनचे सिलिंग शनिवारी सकाळी १0 ते सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान करण्यात आले. निवडणूक लढविणारे उमेदवार यांच्या नावाची तयार करण्यात आलेली मतपत्रिका ईव्हीएम मशीनवर लावण्याचे काम उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर प्रक्रीया निर्वाचन अधिकारी तथा तहसिलदार राजेंद्र इंगळे यांच्या देखरेखीत पार पडली. यंत्रे सीलबंद करण्यापूर्वी सर्व उमेदवार, निवडणूक प्रतिनिधींना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. निवडूक रिंगणात उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांच्या यादीप्रमाणे मतदान यंत्रे सील करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये निवडणुकीदरम्यान कुठलेच यंत्र बंद पडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. निवडणुकीकरिता ९२ मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदानकामी लागणारे ९२ व राखीव १0 अशी मिळून एकूण १0२ मतदान यंत्राची सिलिंग प्रक्रिया पूर्ण करून ते तहसिल कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली. व स्ट्राँगरूम पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली. तसेच सि.सि.टी.व्ही. कॅमेरे सुध्दा सदर परिसरात लावण्यात आले आहे. ही प्रक्रीया १५ टेबलवर ७0 कर्मचार.्यांनी पार पाडली. या सर्व प्रक्रीयेच्या वेळी निर्वाचन अधिकारी राजेंद्र इंगळे उपस्थित होते.
चांदूर रेल्वेत ईव्हीएम सिलिंग प्रक्रिया पूर्ण
Contents hide