साहित्य – लादी पाव, बटर, कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची (सर्व बारीक चिरुन), ठेचलेलं लसूण, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर आणि लिंबू इत्यादी.
कृती – तव्यावर चमचाभर बटर घाला. त्यात कांदा आणि भोपळी मिरची परता. कांदा सोनेरी झाल्यावर लसूण, टॉमेटो, हळद, तखट, गरम मसाला आणि मीठ घाला. दोन चमचे पाणी घालून शिजवून घ्या. अधून मधून हलवत रहा. आवडत असल्यास पावभाजी मसालाही वापरू शकता. आता हा तयार मसाला बाजूला ठेवा. त्याच तव्यावर पुन्हा थोडं बटर घाला. त्यावर आता केलेला थोडा मसाला घालून परता. आता पाव मध्ये कापून घ्या. हा मसाला पावात भरा. त्यावर कोथिंबीर भुरभुरा, लिंबू पळा.पाव भाजून घ्या.
Contents hide