• Sat. Jun 3rd, 2023

घ्या भटकंतीचा निखळ आनंद

ByBlog

Jan 4, 2021

दोस्तांनो, आता अनलॉकच्या प्रक्रियेत काही नियम आणि अटी पाळून पर्यटनाला परवानी दिली जात आहे. त्यामुळे इतके दिवस राहिलेले पर्यटनाचे, भटक़ंतीचे बेत आता पूर्ण करायला हरकत नाही. मुख्यत्वे भटकंतीदेखील विशेष हेतूने, काही तरी ध्येय समोर ठेवून व्हायला हवी. भटकंतीत ताण येऊन उपयोगी नाही. ही भटकंती तुम्हाला अनुभवसंपन्न करणारी, नवं जग दाखवणारी, नवीन माणसं आणि संस्कृतींना जोडणारी असायला हवी. भटकंती म्हणजे प्रवास होऊ नये. तर मग काय करावं यासाठी?
भटकंतीचा निखळ आनंद मिळविण्यासाठी सगळ्यात पहिला आवश्यक मंत्र ठरतो तो संयमाचा. घराबाहेर पडल्यानंतर कोणत्याही क्षणी कोणतंही संकट, कोणतीही परिस्थिती सामोरी येऊ शकते. कुठे एटीएम मशीनच काम करत नाही, बस मस झालीय, सामान हरवलंय, जेवण आवडलं नाही अशा एक ना अनेक गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागतो. तेव्हा अंगी संयम हवाच. तरच तुम्ही या परिस्थितीला सामोरं जाऊ शकाल.
नवख्या ठिकाणी गेल्यावर लवकर उठण्याचं पथ्य पाळा. दिवसाची सुरुवात पहाटेच करा. यामुळे गर्दीविना ते शहर, तिथला निसर्ग तुम्हाला अनुभवता येईल.
भटकंतीत आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या ग्रुपमध्येच रममाण होऊ नका. कधी तरी एकटं भटका, स्थानिकांशी बोला. त्यांच्याबरोबर प्रवास करा. भाषेची अडचण खाणाखुणांनी आणि बोलक्या चेहर्‍याने सहज सोडवता येते हे लक्षात घ्या.
हॉटेल सोडताना काही कागदपत्रं तुमच्याबरोबर असायलाच हवीत. अगदी जवळपास जाणार असलात तरीदेखील तुमच्या सॅकमध्ये पासपोर्टची डिजिटल आणि हार्ड कॉपी, व्हिसा, हेल्थ इंशुरन्स कार्ड, बर्थ सर्टिफिकेट आणि काही महत्त्वाचे फोन नंबर्स असायला हवेत.
प्रत्येक देशाची, प्रांताची संस्कृती वेगळी असते. राहणीमान आणि वागण्या-बोलण्याची पद्धत वेगळी असते. त्यातील काही गोष्टी आपल्याला विस्मयकारक आणि विचित्र भासू शकतात पण त्यावरुद्ध मत प्रकट करु नका. स्थानिक संस्कृतीचा मान राखा. त्यांचे खाद्यपदार्थ आवर्जून चाखा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *