अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, निवडणूक क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी यादिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आला आहे. निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी उपाहारगृहे, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यातील कामगारांना मतदानासाठी १५ जानेवारीला भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे. निवडणूक क्षेत्रातील ग्रामपंचायतीलगतच्या औद्योगिक वसाहती, तसेच महापालिका किंवा नागरी क्षेत्रातील वसाहतीत नोकरीनिमित्त ग्रामीण मतदार येत असतात. त्यांनाही आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.शहरी भागात किंवा निवडणूक नसलेल्या क्षेत्रात दुकाने, कंपन्या, आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही. मात्र, निवडणूक क्षेत्रातील मतदारांना सुट्टीची तरतूद आहे. त्यामुळे संबंधितांना हा आदेश काटेकोर पाळावा, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.
ग्रा.पं. मतदानाच्या दिवशी ग्रामीण मतदारांना सुटी जाहीर
Contents hide