• Thu. Sep 28th, 2023

गोडवे….

ByGaurav Prakashan

Jan 23, 2021
    वेगळेपण मला हवे आता…
    दुःख मी शोधतो नवे आता…
    माग भांडून मागणे अपुले,
    खूप झालीत आर्जवे आता…
    गातसे फौज मुर्ख भक्तांची,
    भोंदुचे नित्य गोडवे आता…
    जीव प्यारा नसेल तर यावे,
    हुकुमशाहीस आडवे आता…
    शांततेचा निरोप देणा-या,
    कबुतरांचे कुठे थवे आता…?
    ऊठ पेटून स्वाभिमानाने,
    सोड लाचार आसवे आता…
    संदीप वाकोडे