• Sun. May 28th, 2023

गृहिणीचे घरकाम कार्यालयात जाणार्‍या नवर्‍याच्या कामाइतकेच महत्त्वाचे

ByBlog

Jan 7, 2021

नवी दिल्ली : घरी काम करणार्‍या गृहिणीेचे काम हे त्यांच्या त्यांच्या ऑफिसला जाणार्‍या नवर्‍याच्या कामाइतकेच महत्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयात वरील निरीक्षण नोंदविले आहे. २0१४ साली दिल्लीत झालेल्या एका अपघातामध्ये मरण पावलेल्या दांपत्याच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्यासंदभार्तील प्रकरणामध्ये न्यायालायने म्हटले आहे. याच प्रकरणाचा संदर्भ घेत न्यायालयाने गृहिणीसुद्धा देशाच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक जडघडणीमध्ये महत्वाचा वाटा उचलतात असेही म्हटले आहे. प्रतिकात्मक पद्धतीने महिलांना वेतन देण्याच्या निर्णयाचे न्यायालयाने स्वागत केले असून असे केल्यास सामाजिक समानता निर्माण होण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल, असे म्हटले आहे. गृहिणींचा पगार किती असावा हे कसे ठरवावे यासंदर्भात काही ठोस साचेबद्ध नियम करता येणार नसले तरी त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळावा असा मुख्य हेतू यामागे हवा असेही न्यायालयाने म्हटले आहे.
गृहिणी करत असलेल्या कामाचा मोबदला ठरवण्यासाठी ठोस असा हिशेब किंवा सूत्र ठरवता येणार नाही कारण त्या आपल्या जवळच्या आणि प्रेमाच्या व्यक्तींसाठी काम करतात. अशावेळेस न्यायालय कायमच गृहिणी करत असलेल्या कामाच्या मोबदल्यामध्ये अगदी निर्मळपणे काय मोबदला देता येईल यासंदर्भात विचार करुन निर्णय घेण्याचा प्रयत्न करते, असेही या निकालामध्ये म्हटले आहे. घरी असणारी कामांची संख्या आणि व्याप्ती पाहता या कामासाठी घरातील व्यक्ती जेवढा वेळ आणि कष्ट खर्च करतात तो खरोखरच आश्‍चर्यचकित करणारा असतो. सामान्यपणे ही कामे पुरुषांपेक्षा महिलाच करताना दिसतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने (मोटर अँक्सिडंट क्लेम ट्रीब्युनल) या प्रकरणामध्ये ४७ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र यावर विमा कंपनीने उच्च न्यायालयामध्ये आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अब्दुल नाझीर आणि न्या. सुर्य कांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. न्यायालयाने मरण पावलेल्या एका दांपत्याच्या दोन लहान मुली आणि मरण पावलेल्या व्यक्तीच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरिक्षण नोंदवले.
यावेळी त्यांनी गृहिणी करत असलेल्या वेगवेगळ्या कामांची व्याप्ती लक्षात घेण्याची गरज असल्याचेही म्हटले. न्या. रमणा यांनी गृहिणींना प्रतिकात्मक वेतन किती द्यावे यासंदभार्तील हिशेब कसा करता येईल याबद्दलचे मत नोंदवले. घरकाम करणारी व्यक्ती बहुतेक वेळेस संपूर्ण कुटुंबासाठी अन्न तयार करते, किराणा सामान आणि इतर घरगुती खरेदीची जबाबदारी पार पाडते, घर व त्याभोवतालची स्वच्छता व देखभाल करते, सजावट करते, दुरुस्ती आणि देखभाल करते, मुलांना आणि कोणत्याही वयोवृद्ध सदस्यांच्या गरजा पूर्ण करते. घरातील आर्थिक बाजू आणि इतरही लहानमोठ्या बर्‍याच गोष्टी सांभाळते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
पारंपरिकरित्या आर्थिक विेषाणांमधून जी माहिती समोर आली त्याची पर्वा न करता घरातील काम करणार्‍या गृहिणींना किंवा व्यक्तींना प्रतिकात्मक वेतन दिले जावे, असे मत न्यायालयाने नोंदवले. गृहिणी किंवा घरातील सर्व काम करणार्‍या घरातील सदस्यांपैकीच एक असणार्‍या व्यक्तीला प्रतिकात्मक वेतन देण्याची आवश्यकता असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *