थंडीमध्ये उष्णता निर्माण करणार्या काही घटकांचा आहारात समावेश करणं योग्य ठरतं. याच हेतूने या काळात गुळाचं सेवन लाभदायी ठरतं. एरवीदेखील जेवणानंतर गुळाचा छोटा तुकडा खाल्ल्याने आरोग्यविषयक लाभ होऊ शकतात. यातल्या जीवनसत्त्वं, खनिजं, पोषक घटक आणि लोहामुळे अनेक रोगांपासून बचाव होतो. गुळाच्या अशाच काही लाभाविंषयी..
उष्ण असल्याने थंडीत गूळ खाल्ल्यास सर्दी-खोकल्यासारखे विकार दूर राहतात. गुळामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. स्नायू आखडण्याचं प्रमाण कमी होत असल्याने शारीरिक वेदनांपासून आराम मिळतो. गूळ खाल्ल्याने शरीरातली विषद्रव्यं बाहेर पडतात. गुळातल्या मुबलक पोषक घटकांमुळे लाल रक्तपेशींची संख्या वाढते आणि रक्ताची कमतरता दूर होते. गुळामुळे शरीरातल्या आम्लांचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे जेवणानंतर गुळाचा तुकडा चघळल्यास अँसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या दूर होऊ शकते.
गुळामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहत असल्याने डोकेदुखीची समस्या दूर होते. गुळामुळे पचनक्रिया सुधारून पोटदुखीची समस्या दूर होते. गुळाच्या नियमित सेवनामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर पडत असल्याने रक्त शुद्ध होऊन त्वचा तजेलदार दिसू लागते. गुळाच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो.
गुळाचे आरोग्यदायी लाभ
Contents hide