• Tue. Sep 26th, 2023

गिळताना त्रास होतोय?

ByGaurav Prakashan

Jan 25, 2021

गिळताना त्रास होणं ही सर्वसाधारण समस्या आहे. प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीना ही समस्या जाणवू शकते. गिळताना वेदना होत असतील तर हे जंतूसंसर्ग किंवा अँलर्जीचं लक्षण असू शकतं. गिळताना तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील किंवा खाताना, पिताना, श्‍वास घेताना अडथळे येत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ल्ला घ्यायला हवा.
सर्दी, फ्लू, जुनाट कफ, घशाचा जंतूसंसर्ग, टॉन्सिल्स ही यामागची सर्वसाधारण कारणं असू शकतात. मानेजवळ आलेली सूज, घशाला दुखापत होणं, कानांचा जंतूसंसर्ग, मोठय़ा आकाराच्या गोळ्या घेणं, वेफर्स किंवा इतर पदार्थ चुकीच्या पद्धतीने गिळणं यामुळे काही काळासाठी गिळायला त्रास होऊ शकतो. गिळताना त्रास होणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
गिळताना वेदना होत असतील तर काही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यात छातीचा जंतूसंसर्ग, बॅक्टेरिया किंवा विषाणूंमुळे झालेल्या जंतूसंसर्गाने गंभीर स्वरूप धारण करणं, तोंडाची चव जाणं, मानेला सूज आल्याने डोक्याच्या हालचालींवर र्मयादा येणं, गिळताना वेदना होण्यासोबत जंतूसंसर्ग झाला असेल तर ताप, थंडी, डोकेदुखी, कोरडा खोकला, घाम येणं, टॉन्सिल्स लाल होणं अशी लक्षणं दिसू शकतात.
लहान मुलांना गिळताना त्रास होणं तसंच श्‍वास घ्यायला त्रास होणं, घशाला सूज येणं अशी लक्षणं दसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. प्रौढांमध्ये तोंड उघडायला त्रास होणं, गिळायला त्रास होणं, घशात तीव्र स्वरूपाच्या वेदना जाणवणं, श्‍वास घ्यायला त्रास होणं ही लक्षणं असतील तर डॉक्टरांकडे जायला हवं. खोकताना रक्त येणं, एक आठवड्यापेक्षा जास्त काळ गिळायला त्रास होणं, दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाज घोगरा राहणं, सांधेदुखी, मानेत गाठ, पुरळ अशी लक्षणं असतील तर लवकरात लवकर औषधोपचार सुरू करायला हवेत. त्यासाठी निदान लवकर होणं गरजेचं ठरतं.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!