Skip to content
अनोळखी असूनही निःसंकोचपणे
तासनतास गप्पा मारत बसायचा
परक्यासाठीही होतं प्रेम आपुलकी
जिवाभावाची माणसंच आता दुर गेली
ज्या आई-बाबांनी ज्यांना वाढवलं
तीच औलाद त्यांना विसरू लागली
नातवंडांचा लळा लागू नये म्हणून
माय-बाप वृध्दाश्रमात नेऊन सोडली
कशासाठी करतो का कुणास ठाऊक
भौतिक सुखासाठी सर्व नाती तोडली
माणूस इतका माणुसघाणा झाला की
तुझ्या किळसवाण्या वर्तनाने
धरतीसुद्धा थरथर कापू लागली
शोध घ्यावा लागेल तिचा नव्याने
गर्दीत माणसाच्या माणुसकी हरवली..
मु.दापेगाव ता. औसा जि.लातूर
Post Views: 33
Like this:
Like Loading...