क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना Online काव्यातून अभिवादन

अमरावती : दि.३ जाने, २०२१ रोज रविवारला विश्ववंदनीय व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व आद्यकवयित्री “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले “यांच्या जयंतीदिनी “महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून “शाक्यसिंह बुध्दीस्ट सोसायटी” व “विचारयश मासिक साहित्य समूहाच्या “वतीने आँनलाइन काव्यात्मक अभिवादनाचा एक आगळा वेगळा उपक्रम झुम अँपवर “क्रातीची फुले” या सदरात घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन अस्मिता मेश्राम साहित्यिक ,भंडारा व कविता काळे कवयित्री, पुणे यांनी करून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ.डाँ.शोभा गायकवाड ,अमरावती या नामवंत लेखिकांनी भूषविले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ.सरिता सातारडे कवयित्री, नागपूर यांनी केले. संस्थापक अँड.प्रशांत सिरसाट ,औरंगाबाद यांचे कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कवी-कवयित्रींनी आपल्या प्रभावी काव्यातून माता सावित्री यांच्या कार्याचे गौरवगान सादर केले.
सहभागी साहित्यिकांमधे आ.पुष्पाताई बोरकर-बडनेरा, प्रा.अरूण बुंदेले-अमरावती, कांचन मुन-पुणे, प्रा.नरेश तांबे-मुंबई, अर्चना चव्हाण-नागपूर, सितारामजी नरके-पुणे, प्रा-प्रज्ञा मेश्राम-नागपूर, बाळकृष्ण अमृतकर-पुणे, चित्तरंजन चौरे-नागपूर, विद्या निसरगंध-बिड, प्रा.पद्मा नागदेवे-नागपूर, सुनंदा बोदिले-अमरावती, वैभवी मराठे-बोइसर, सुजाता साळवे-कल्याण, रुपाली अवचरे, पुणे, उमा लुकडे-पुणे आदींनी एकासरस एक रचना सादर करून वंदनीय माता सावित्रीस अभिवादन केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!