अमरावती, दि. 15 : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा उद्या (16 जानेवारी) सकाळी साडेदहा वाजता शुभारंभ होणार आहे.जिल्ह्यात लसीकरणासाठी पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर प्रत्येकी 100 लाभार्थ्यांप्रमाणे 500 लाभार्थ्यांना लस दिली जाईल.
याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. या लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 16 हजार 262 हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात सुमारे 17 हजार लसींचा डोस प्राप्त आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.
Contents hide