साहित्य दोस्याकरिता : बटाटे २ नग, आरारोट १ चमचा, मीठ चिमूटभर.
मसाल्याकरिता साहित्य : ओलं खोबरं १ वाटी, मीठ, लिंबू, साखर चवीनुसार, दाण्याचा कुट अर्धी वाटी, जीरे १ चमचा, कोथिंबीर, हिरवी मिरची ४-५, दही अर्धी वाटी, काज ू किसमिस.
कृती : बटाटे किसून त्यामध्ये चवीनुसार मीठ, १ चमचा आरारोट घालून हे मिर्शण पातळ-पातळ तव्यावर पसरवा. थोडे तेल घालून झाकून ठेवा. तोपर्यंत दाण्याचा कुट, खोबरं, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, लिंबू, साखर एकत्र करून दोस्याच्या आतील मसाला तयार करून ठेवा. त्यावर जिर्याची फोडणी घाला. एका पातेल्यात २ चमचे तेल गरम करून त्यामध्ये जीरे, हिरवी मिरची व पाणी घालून उकळी येऊ दया. नंतर यात घोटलेले दही, दाण्याचा कुट, चवीनुसार मीठ, साखर कोथिंबीर पातळ आमटी सारखे तयार करा. नंतर झाकून ठेवलेल्या दोस्यावर खोबर्याचा मसाला, काज ू किसमिस घालून रोल करा व आमटी बरोबर खायला द्या.
Related Stories
September 29, 2023
June 6, 2023