कॉटन ग्रीन कॉलनी येथे रस्ते डांबरीकरण कामाचे आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन….

अमरावती : अमरावती शहरी क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलविण्याकरिता नियोजन बद्ध विकास कार्यक्रम राबविताना जनतेचा विश्वास सार्थ ठरवीत आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने जनसंपर्कातून विकास नकामांच्या पूर्ततेवर सातत्यपूर्ण भर दिल्या जात आहे. याच श्रुंखलेअंतर्गत शनिवारी मनपा क्षेत्रांतर्गत प्रभाग क्रमांक ०३ नवसारी परिसर स्थित कॉटन ग्रीन कॉलनी येथे रस्ते डांबरीकरण कामाचे आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद तसेच महिला भगिणींचीही सशक्तपूर्ण साथ आणि युवक बांधवांचा पुढाकार या त्रयीच्या माध्यमातून विकास कार्यक्रमांची मालिका राबविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. या शब्दामध्ये आमदार महोदयांनी यावेळी स्थानीय नागरिकांशी संवाद साधला यादरम्यान नागरिकांची चर्चा करताना स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासह आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने आगामी काळात या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. अशी भूमिका सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली. कॉटन ग्रीन कॉलनी परिसरातील बुंदिले यांच्या घरापासून ते संतोषी माता नगर पर्यंत च्या रस्ता डांबरीकरणाचे यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत डवरे, नगरसेविका मंजुश्री महल्ले, नीलिमा काळे, प्रशांत महल्ले, मनपा चे सहाय्यक अभियंता आशिष अवसरे, वर्षा कुऱ्हेकर , नितीन भेटाळू, भोजराज काळे, सुयोग्य तायडे, आकाश वडनेरकर, स्वप्नील धोटे, सारंग देशमुख, नारायणराव खंडारे, राजेंद्र कश्यप, वरुडकर, विलास तायडे, नितीन खैरकर, सारंग भोंडे, विनोद गुडधे, सर्वश्री पिंपळे, नेटके, पंडागळे, मोरे, भारत सवई, काळे, आदींसहित स्थानीय नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी विकासकामांची पूर्तता होत असल्याबद्दल स्थानीय नागरिकांनी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे अभिनंदन करीत धन्यवाद व्यक्त केले . कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे नगरसेवक प्रशांत डवरे व नगरसेविका मंजुश्री महल्ले यांनी आभार मानले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!