नवी दिल्ली : यंदा करोना निबंर्धांमुळे अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाची छपाई केली जाणार नसून खासदारांना त्याचे इलेक्ट्रॉनिक वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी हलवा कार्यक्रमाने अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जात होती. स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्पातील मिळकत आणि खर्च याबाबतचे दस्तऐवज, त्याचबरोबर वित्त विधेयक, नव्या करांबाबतचा सविस्तर तपशील आणि नव्या आर्थिक वषार्साठीच्या अन्य उपाययोजनांबाबतच्या दस्तऐवजाची छपाई करण्यात येणार नाही.
केंद्रीय अर्थसंकल्प (२0२१-२२) यंदा प्रथमच कागदविरहित पद्धतीने सादर केला जाणार आहे. संसदेत १ फेब्रुवारी २0२१ रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. खासदारांना आणि जनतेला अर्थसंकल्पाचा दस्तऐवज सहज उपलब्ध व्हावा यासाठी अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल-अँपसेवा सुरू केली आहे. अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाच्या संकलनाची सुरुवात ज्या कार्यक्रमाद्वारे केली जाते त्या प्रतीकात्मक हलवा समारंभात शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर सहभागी झाले होते.
केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी
Contents hide