मुंबई : भोजपुरीपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीपयर्ंतचा प्रवास करणार्या रश्मी देसाईचे घराघरात फॅन्स आहेत. रश्मीने आत्तापयर्ंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. रश्मीला या स्थानापयर्ंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. एका मुलाखतीमध्ये तिने काही धक्कादायक खुलासे केले आहेत, रश्मी म्हणाली, मला इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचा अनुभव आला. घटस्फोटामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. रश्मीने खासगी आयुष्यातही बराच संघर्ष सहन केला आहे. एका मनोरंजन संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रश्मी म्हणाली, माझं बालपण खूप कष्टाचं गेलं आहे. घरची परिस्थिती गरिबीची होती. काही वेळा २ वेळच्या जेवणाचीही भ्रांत असायची. लहानपणी मी रहायचे तिथे एक अशी बाई होती, जिची माझ्यावर सतत नजर असायची. ती मला पळवून नेण्याच्या प्रयत्नात होती. रश्मी पुढे म्हणते की, १६ वर्षाची असतानाच मी इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मला एका असा माणूस भेटला होता जो नव्या मुलींच्या गरजेचा गैरफायदा घ्यायचा. इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा आला होता की, नव्या लोकांचा कास्टिंग काऊचमुळे बळी जायचा. तुम्हाला कास्टिंग काऊचसारख्या किळसवाण्या अनुभवातून गेल्याशिवाय कामच मिळायचं नाही. माझ्यासोबतही तसाच प्रकार घडला होता.१६ व्या वर्षी माझं शोषण झालं होते, असा खळबळजनक खुलासा रश्मि देसाईने केला आहे. रश्मीनी पुढे सांगितलं, मी १६ वर्षाची असताना मला ऑडिशनच्या बहाण्याने सुरज नवाच्या एका माणसाने बोलवलं. मला एक ड्रिंक प्यायला दिलं. त्या पेयामध्ये काहीतरी मिसळलेलं होतं. त्याने माज्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.सध्या होत असलेल्या ट्रोलिंगबद्दलही तिने मोकळेपणाने मत मांडलं, ह्यमलाही अनेकांनी अनेकदा ट्रोल केलं आहे. पण मी काय कपडे घालायचे, काय बोलायचं, किंवा कसा मेक-अप करायचा हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. त्यामुळे ट्रोलर्सकडे मी फारसं लक्ष देत नाही.
कास्टींग काऊचशी झाला होता रश्मी देसाईचा सामना
Contents hide