• Mon. Jun 5th, 2023

कापूस पिकावरील शेंदरी, गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

ByBlog

Jan 8, 2021

अमरावती : कापूस पिकावरील शेंदरी, गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याचे सूचविले आहे. शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीपासून कापूस पीकाचे संरक्षण करण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

शेतकरी बांधवांनी कापुस पिकावरिल शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फरदड घेऊ नये. हंगाम संपल्यावर शेतामध्ये शेळया,मेंढया तसेच इतर जनावरे चारण्यासाठी सोडावीत. कापुस पिक काढणीनंतर शेतातुन काढुन टाकावेत, फरदड घेऊ नये. कापुस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा (श्रेडर) शेतात वापर करावा. पिक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थित न घडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ करावे.

कपाशीच्या पऱ्हाट्यामध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करुन बांधावर ठेवु नये. कापुस विरहीत शेत ठेवल्यास शेंदरी बोंड अळीचे जीवनचक्र संपुष्टात येते व त्यामुळे हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. शेंदरी बोंड अळीस खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनचक्र चालु राहुन पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो. पिक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीवर आलेले किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. जिनिंग – प्रेसिंग मिल तसेच कापुस साठवण केलेल्या जागी कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स ) लावावेत. उपरोक्तप्रमाणे उपाययोजना शेंदरी व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात कराव्यात, असे आवाहन अमरावती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *