काँक्रिटीकरण सुरु असल्याने पर्यायी मार्गाच्या वापराचे आवाहन

अमरावती : शहरातील शेगाव नाका ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीत आहे. त्यानुसार आशियाड कॉलनी पुलापासून शिल्पकला कॉलनीपर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूचे काम सुरू असल्याने ती बाजू 13 फेब्रुवारीपर्यंत बंद राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंत्यांनी केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्याचप्रमाणे, अमरावती- अचलपूर रस्त्यावरील चौपदरी रस्त्याच्या सुधारणेचे कामही प्रगतीत आहे. या रस्त्यावर भारत पेट्रोल पंपासमोरील (असोरिया पंप ते आमदार सुलभाताई खोडके यांचे जनसंपर्क कार्यालय) डाव्या बाजूचे साडेतीनशे मीटर लांबीचे काँक्रिटीकरण सुरु आहे. त्यामुळे डावी बाजू 14 फेब्रुवारीपर्यंत बंद राहील. नागरिकांनी उर्वरित रस्त्याचा दुतर्फा वाहतुकीसाठी नियम पाळून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.