नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) गुजरातच्या राजकोट एम्सच्या पायाभरणी कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. आधी मी म्हणत होतो की जेव्हापयर्ंत औषध नाही तेव्हापयर्ंत निष्काळजीपणा नाही, आता आपला २0२१ चा मंत्र असेल औषधही आणि काळजीही, असे म्हणत नव्या वर्षात आशेचा किरण दिसत असल्याचे म्हटले. २0२0 आरोग्याच्या बाबतीत अभूतपूर्व वर्ष ठरल्याचे यावेळी पंतप्रधानांनी म्हटले. सोबतच आरोग्य हीच संपदा असल्याची शिकवण या वर्षाने दिल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
राजकोटचे एम्स आरोग्याशी संबंधित मुलभूत सुविधा व वैद्यकीय शिक्षणाला चालना देईल. तसेच गुजरातमध्ये रोजगार संधी आणेल. पाच हजार थेट नोकर्या तर अगणित अप्रत्यक्ष रोजगार संधी मिळतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी राजकोट एम्सचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गुजरातने कोविडशी लढण्याचा मार्ग दाखवला. गुजरातने उत्तमप्रकारे कोरोना आव्हान हाताळले, याचे श्रेय त्यांनी गुजरातच्या मजबूत वैद्यकीय मुलभूत सुविधा व्यवस्थेला दिले. गुजरातच्या वैद्यकीय क्षेत्राला लाभलेले हे यश दोन दशकांचा अविरत पर्शिम, सर्मपण आणि निर्धाराचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एवढी दशके उलटूनही देशात फक्त ६ एम्स आहेत, असे ते म्हणाले. अटलजींच्या २00३ मधील सरकारने अजून ६ मोठी एम्स स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. गेल्या सहा वर्षात १0 नवी एम्स सुरू झाली आणि काहींचे उद््घाटनही झाले. एम्सशिवाय काही सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची उभारणी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
औषध आणि काळजी हाच नववर्षाचा मंत्र
Contents hide