पालघर : औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर संभाजीनगर केले तर महाविकास आघाडीचे सरकार लवकरच कोसळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. पालघर येथील शासकीय विर्शामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरामुळे वाद होईल आणि महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे या वादात राज्य सरकारने पडू नये. नामांतर करायचे होते तर पूर्वी सरकार होतं त्यावेळी का केलं नाही, असा सवालही आठवले यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून आपल्या शुभेच्छा आहेत. मात्र, ते पुढे किती दिवस पदावर राहतील हे सांगता येत नाही. त्यामुळे हे सरकार पडून भाजप आणि रिपाइंचे सरकार राज्यात विराजमान होईल. केंद्राप्रमाणे मुंबई महानगरपालिकेतही भाजप आणि रिपाइं पक्षाची सत्ता येवून भाजपचा महापौर आणि रिपाईचा उपमहापौर असेल असा विश्वासही व्यक्त केला. तसेच पालघर येथील प्रश्नांबाबत बोलातना आठवले म्हणाले, पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर देशातील सर्वांत मोठे बंदर असून हे बंदर झाले तर येथील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. डहाणू तालुक्यात होत असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात कृति समिती आक्रमक असून त्यांनी गत महिन्यात मोठमोठी आंदोलने करून सरकारला जेरीस आणले आहे. जेएनपीटी अंतर्गत होत असलेले सर्वेक्षणही हाणून पाडले होते. मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी या बंदराला विरोध केला असून केंद्राने मात्र संमती दिल्याने वाद आणखीनच चिघळणार आहे, असे मत यावेळी आठवले यांनी व्यक्त केले. वाढवण प्रश्नी पुढे आठवले म्हणाले, वाढवण बंदरामुळे येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिकांनी त्याला विरोध करू नये. आपण जिल्हाधिकार्यांशीही बोललो असून समुद्रात पाच एकर भराव होणार असून बाहेरील तीन साडेतीन एकर जमिनीचे आरक्षण होणार आहे. कृषी कायद्यामुळे शेतकर्यांचा कोणताही तोटा नसून फायदाच होणार आहे.
औरंगाबादचे नामांतर झाल्यास सरकार कोसळेल – आठवले
Contents hide