• Wed. Sep 27th, 2023

एसटी मालवाहतुकीच्या दरात ४ रुपयांची वाढ

ByBlog

Jan 9, 2021

मुंबई : करोनामुळे आर्थिक उत्पन्न बुडालेल्या एसटी महामंडळावर इंधन दरवाढीमुळे संकट ओढावले आहे. वाढत्या डिझेल दरामुळे महामंडळाने मालवाहतुकीच्या प्रति किलोमीटर दरात ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ११ जानेवारीपासून नवीन दरवाढ लागू होईल. नवीन दरानुसार मालवाहतुकीसाठी प्रति किमी ४२ रुपये दर आकारला जाणार आहे.
महामंडळाला डिझेलचा पुरवठा दोन बडय़ा इंधन कंपन्यांकडून होतो. महामंडळ हे घाऊक विक्रेते असल्याने त्यांचे दर १५ दिवसांनी बदलतात. महामंडळाला दिवसाला १ लाख लिटर डिझेल लागत असून, डिझेल खरेदीसाठी वर्षांला ३ हजार कोटींची तरतूद के ली जाते.
टाळेबंदीत प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू केली.
१ हजार १२५ प्रवासी एसटी गाडय़ांमध्ये बदल करून त्याचे मालवाहतूक ट्रक तयार केले आहेत. सध्या त्यांच्या ६२ हजार फेऱ्या होत असून ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र सातत्याने डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने महामंडळाने अखेर मालवाहतुकीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!