• Thu. Sep 28th, 2023

आ. देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने संजय काळे यांची मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया

ByGaurav Prakashan

Jan 21, 2021

मोर्शी : मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार वरुड मोर्शी तालुक्यातील रुग्णांचा ईलाज करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात, आमदार देवेंद्र भुयार यांनी ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना मदत करत आहे. त्यांनी आदिवासी व ग्रामीण भागांत राहणार्‍या गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवविण्याचे काम करीत आहे. मोर्शी येथून जवळ असलेल्या लाडकी येथील संजय काळे या युवकाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने मुंबई येथे हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. मोर्शी तालुक्यातील लाडकी येथील संजय भीमराव काळे यांचे हिप रिप्लेसमेंट उजवाभाग जवळपास २ लक्ष रुपयांचे ऑपरेशन मुबंई येथील भाटिया हॉस्पिटल येथे करण्यात आले असून त्यांची हिप रिप्लेसमेंट ची शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाहि. संजय काळे यांच्या तब्बेतीची माहिती मिळताच आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने मुंबई येथील भाटिया हॉस्पिटल मध्ये संजय काळे यांना दाखल करण्यात आले. व हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया तात्काळ व मोफत करण्यात आली. मोर्शी तालुक्यात दौर्‍यावर असताना आमदार भुयार यांनी लाडकी येथील संजय काळे यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेऊन हिप रिप्लेसमेंट डाव्या भागाची शस्त्रक्रिया सुद्धा लवकरच मुंबई येथे करण्यात येणार असल्याचे सांगितले. आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने व सहकार्याने संजय काळे या युवकाचे चे जीवन सुकर झाल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार व्यक्त केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!