मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. आशिष शेलार यांनी अचानक पवारांची भेट घेतल्याने राजकीय वतरुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, काही वेळानंतर शेलारांनीच या भेटीचे कारण उघड केले.
काही दिवसांपूर्वीच एका पुस्तक प्रकाशनसोहळ्यात शेलार आणि पवार यांची भेट झाली होती. त्यावेळी शेलार यांनी राज्यात मराठा महिला राज्याची मुख्यमंत्री व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. शेलार यांच्या वक्तव्याचा रोख खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे असल्याच्या चर्चाही सुरु होत्या. तसेच, महाराष्ट्रात त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकारण ही रंगले होते. त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या वक्तव्याच स्पष्टीकरण देत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या घडामोडींनतर पुन्हा एकदा शेलार यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आशिष शेलार यांनी शरद पवारांची भेट घेत मराठा आरक्षणावर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. आरक्षणाबाबत मराठा तरुणांच्या भावना पवारांना माहिती आहेत. या भावना अतिशय तीव्र आहेत. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडताना या विषयाचे गांभीर्यही पवारांना माहिती आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली आहे.
आशिष शेलार-शरद पवार यांची भेट
Contents hide