• Tue. Jun 6th, 2023

आरोग्यदायी राहण्यासाठी..

ByBlog

Jan 4, 2021

फिटनेसचा मंत्र पाळायचा असेल तर आवडते पदार्थ खाण्यावर अंकुश ठेवणं गरजेचं ठरतं. पण तज्ज्ञांच्या मते, फिट राहण्यासाठी आवडते पदार्थ वज्र्य करण्याची काहीच गरज नाही. किचनमधील काही उपकरणांच्या मदतीने तुम्ही आरोग्य जपू शकता. आरोग्यदायी राहण्यासाठी स्वयंपाकघरात ही उपकरणं असायला हवीत.
घरात आयोजित होणार्‍या पार्टीला किंवा सहज म्हणून बार्बेक्यू करून बघायचं असेल तर छानसा ग्रिलर विकत घ्या. बाजारात विजेवर चालणारे ग्रिलर मिळतात. गॅसवर ठेवता येणारे ग्रिलरही उपलब्ध आहेत. वडा, भजी, समोसा, फ्रेंच फ्राईजसारखे पदार्थ सर्वांनाच आवडतात. पण डाएटच्या कारणामुळे ते खाण्यावर बंधन येतं. पण हेच पदार्थ कमी तेलात करायचे असतील तर एअर फ्रायर आणा. एअरफ्रायरमुळे पदार्थांमधल्या फॅट्सचं प्रमाण ८0 टक्क्यांनी कमी होतं. उकडलेल्या भाज्या तसंच वाफवलेलं चिकन खायचं असेल तर स्टिमर घेऊ न या. कडधान्यांना मोड आणण्यासाठी स्प्राउट मेकर घेऊ न या. या यंत्रात कडधान्यांना लवकर मोड येतात. कडधान्यं खराबही होत नाहीत.आरोग्यदायी राहण्यासाठी..
फिटनेसचा मंत्र पाळायचा असेल तर आवडते पदार्थ खाण्यावर अंकुश ठेवणं गरजेचं ठरतं. पण तज्ज्ञांच्या मते, फिट राहण्यासाठी आवडते पदार्थ वज्र्य करण्याची काहीच गरज नाही. किचनमधील काही उपकरणांच्या मदतीने तुम्ही आरोग्य जपू शकता. आरोग्यदायी राहण्यासाठी स्वयंपाकघरात ही उपकरणं असायला हवीत.
घरात आयोजित होणार्‍या पार्टीला किंवा सहज म्हणून बार्बेक्यू करून बघायचं असेल तर छानसा ग्रिलर विकत घ्या. बाजारात विजेवर चालणारे ग्रिलर मिळतात. गॅसवर ठेवता येणारे ग्रिलरही उपलब्ध आहेत. वडा, भजी, समोसा, फ्रेंच फ्राईजसारखे पदार्थ सर्वांनाच आवडतात. पण डाएटच्या कारणामुळे ते खाण्यावर बंधन येतं. पण हेच पदार्थ कमी तेलात करायचे असतील तर एअर फ्रायर आणा. एअरफ्रायरमुळे पदार्थांमधल्या फॅट्सचं प्रमाण ८0 टक्क्यांनी कमी होतं. उकडलेल्या भाज्या तसंच वाफवलेलं चिकन खायचं असेल तर स्टिमर घेऊ न या. कडधान्यांना मोड आणण्यासाठी स्प्राउट मेकर घेऊ न या. या यंत्रात कडधान्यांना लवकर मोड येतात. कडधान्यं खराबही होत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *