राळेगाव : सरपंच आरक्षण निघण्याचा काही दिवस अवधी असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीनंतर होणारी पळवापळवी घोडेबाजार तात्पुरता का होईना थांबलेला आहे. इच्छुक सदस्यांना सरपंच पदाचे स्वप्न बेचैन करीत असून रात्रीची झोप व दिवसाचे चैन हरवले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या स्वतंत्र व राजकीय पक्ष समर्थीत पॅनल आघाड्यांचे उमेदवार व स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. सर्मथकांनी जल्लोषात गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. परंतु सरपंच कोण याचा पेच अजूनही कायम असल्याने सर्वच पेचात सापडले आहे.
सरपंच पदाचे आरक्षण कोणासाठी हे स्पष्ट न झाल्याने अनेक संभाव्य सरपंचाचा हिरमोड झाला आहे. गावच्या सर्वांगीण विकासाची धुरा ग्रामपंचायत वर पयार्याने सरपंच व ग्राम कमिटीवर असते. गाव कारभारी होण्यासाठी गावा-गावात सर्मथक व आघाड्यांच्या विजयासाठी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी यंदा प्रचंड उत्साह दाखविण्यात आला. पक्षीय पुढार्यांची साथ मिळाल्याने कार्यकर्तेही जोशात होते. स्वत: पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेऊन विजयश्री खेचून आणत अनेकांनी स्वत:ला सिद्ध करून दाखविले परंतु यावर्षी मागील थेट सरपंच निवडण्याचे जुने धोरण रद्द केले आहे.
त्या धोरणाचा भाग म्हणून प्रथम सदस्यांची निवड व त्यानंतर आरक्षण सोडत अशी सरपंच निवडणूक होत असल्याने अनेकाचा जीव भांड्यात पडला आहे.
आरक्षणाच्या पेचात अडकले भावी सरपंच
Contents hide