• Tue. Jun 6th, 2023

आयटीआय उत्तीर्णांसाठी 12 जानेवारीला रोजगार मेळावा

ByBlog

Jan 8, 2021
    प्रशिक्षणार्थींनी सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे प्राचार्यव्दारे आवाहन

अमरावती : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावतीव्दारा मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र यांच्यामार्फत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंगळवार, दि. 12 डिसेंबर रोजी, सकाळी 11 वाजता आयटीआय उत्तीर्ण तसेच शिकाऊ (अपीअर) विद्यार्थ्यांसाठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रासह या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्या सौ.एम. डी. देशमुख यांनी केले आहे.
या मेळाव्याला धूत ट्रान्समिशन प्रा. लि. औरंगाबाद कपंनीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून फिटर-50, वायरमन-70, इलेक्ट्रॉनिक मॅकनिक-65, प्लंबर-15, आयसीटीएसएम-55, वेल्डर-10, कोपा-60, ड्रेस मेकींग-40, इलेक्टीशियन-85 आदी ट्रेडसाठी प्रशिक्षणार्थींची ॲप्रेनटीससाठी सदर कंपनीत निवड करण्यात येईल..
तसेच फुड व्हेजीटेबल प्रोसेसिंग-50, कॉम्प्यूटर हार्डवेअर-70, स्टेनोग्राफी-40, फॅशन टेक्नोलॉजी-50 आदी ट्रेडसाठी फक्त मुलींनाच प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही संस्थेच्या प्राचार्य यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *