• Thu. Sep 28th, 2023

आम्ही प्रकाश आंबेडकरांना लस देणार नाही – रामदास आठवले

ByGaurav Prakashan

Jan 25, 2021

नवी दिल्ली : देश्भरात सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला चांगला प्रतिसाद मिळत असून ज्यावेळी आम्हाला लस दिली जाईल, तेव्हा ती निश्‍चित घेतली जाईल. पण प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी लस घेणार नाही आणि आम्ही त्यांना अजिबात देणार नाही, असे मिश्किल विधान केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केले. आज पुण्यात आयोजित एका पत्रपरिषदेत ते बोलत होते.
ज्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लस तयार करण्यात आली. तिथे दोन दिवसांपूर्वी आग लागली. त्या घटनेत जवळपास हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीला केंद्र सरकारकडून कशा प्रकारे मदत मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले. त्याचबरोबर त्या आगीच्या घटनेत निष्पाप पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कंपनीकडून २५ लाखांची मदत देखील जाहीर झाली आहे. पण आता कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना तिथे नोकरी द्यावी, अशी मागणी मी पूनावाला यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले. लसीला विरोध करणायांनीच आग लावली आहे का? नेमके काय झालेले आहे? या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, मी घटनास्थळाकडे चाललेलो आहे. असे देखील आठवले यांनी यावेळी बोलून दाखवले. पुण्यात ३0 जानेवारी रोजी एल्गार परिषद घेण्यास पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे, ही बाब ठीक आहे. पण त्यामध्ये कोणी नक्षलवादी लोक असू नये. तिथे आंबेडकर आणि गांधीवादी लोक व्यासपीठावर असावेत, असे मत रामदास आठवले यांनी पुण्यात होणार्‍या एल्गार परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!