• Wed. Sep 20th, 2023

आता बोंबला..!

ByBlog

Jan 9, 2021
    आता बोंबला (विनोदी वर्हाडी लेखन…)
    चला बसा लवकर
    दूर दूर म्हणतो मी ….
    सोशल दिष्टींग पाळून म्हणतो मी…
    तर आता आपले नामदेव भाऊ आपल्याला ह्या करुना बद्दल डिटेल सांगणार हाय …
    ओ रमश्या? माय जे काय सांगाच ते एकट्यात सांग चार चोघात कायले सांगा लागते !
    अव मावशे तुया बद्दल नाही… थे सद्या बीमारी चालू हाय ना तिचं नाव हाय थे….
    मंग भोपयसुत्या कोरोना म्हंन न! चाल्ला करुना करुना म्हणाले…
    आले नामदेव भाऊ …
    सोशल दिस्टिंग म्हणून सरपंच दुरूनच नेम धरून तेयच्या गयात हार फेक्तीन अशी मी त्यांना इनंती करतो !
    नाही, त्यानं माणुसकी दिसणार नाही म्हणून मी तेयची गयाभेटच घेतो!
    हा तर नामदेव भाऊचा परिचय म्हंजे ….
    भाऊ सुरतले कामाले होते…
    तिकुन काढल्यामुळे भाऊ मोठ्या मुश्किलीने सारे नाके चुकोत चूकोत ट्रकच्या आधारान हिथ पोचले !
    म्हणून म्हणतो असा प्रचंड अनुभवी माणूस आपल्याला लाभला
    वाजवा टाया….
    करा भाऊ सुरू ..
    त मित्रांनो! ह्या जो कोरोण्या हाय, हा म्हंजे तिकून आला आपल्या हिकुन नाही !
    म्हंजे कुकुन आला ?
    असे माय म्हंधात चबरत जाऊ नोका… माई लिंग तुटते !
    आपल्या हिकून कोन विरोध केला नाही काय?
    भाऊ समजत नाही त, बोलावं नाही… बसा खाली !
    त ह्याच अस हाय, जरा कठीन काम हाय!
    म्हंजे, मले त असं वाटते तुम्हाले एका मीटिंगगित समजनारच नाही …
    त्यासाठी, सामाजिक बांधिलकी म्हणून जीव धोक्यात घालून तुमाले पुर डिटेल सांग्यासाठी …..
    मी काही दिवस तुमच्या गावात राहाचा निर्णय घेतला हाय….!
    वाजवा टाया…
    फक्त आपली राहाची सोय अन् दोन टाईम जेवन खावन फक्त एव्हढ तुम्ही पा!
    बाकी मी कोनती फी घेनार नाही….
    अन् तुम्हाला दुरुस्त करूनच जाईन .…
    आ..? आंब्युलांस अन् पोलिसाची गाडी कायले आली !
    पया घरी ..,.
    सरपंच, या नामदेवचा फक्त रिपोर्ट यायची आम्ही वाट पाहून रायलो होतो !
    हा म्हणे पयले कागद दाखवा ?
    अन् आम्हाले रोज गाव बदलून, बदलून च्याटा देऊन रायला …
    अन् सरपंच तुम्ही, अन् याले आनासाठी गेलेले तुमचे सारे मानस, हेच्या संपर्कात आले…
    आता चला तुम्ही चौदा दिवसासाठी आमच्या सांग !
    काय म्हनता?
    हेथ लेक! याले म्हणते कराले गेलो काय,
    अन् उलटे झाले पाय….
    सुनिल ढोकणे
    मूर्तिजापूर
    9421830710